IMPIMP

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात

by nagesh
Yoga Guru Ramdev Baba | yoga guru ramdev baba on women wearing saree amruta fadnavis cm eknath shinde devendra fadnavis

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – योगगुरू रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba) आज (शुक्रवार) ठाण्यात होते. त्यांनी तिथे सकाळी योग विज्ञान शिबिर घेतले, त्यानंतर महिलांचा योग प्रशिक्षण उपक्रम पार पडला. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या योग शिबिरानंतर लगेच महिला महासंमेलन पार पडले. महिलांनी या कार्यक्रमात येताना योगासाठी ड्रेस आणि महासंमेलानासाठी साड्या आणल्या होत्या. पण योग्य प्रशिक्षणानंतर लगेच महासंमेलन सुरु झाल्याने महिलांना त्यांनी आणलेल्या साड्या घालायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे महिला थोड्या नाराज होत्या. पण बाबा रामदेव (Yoga Guru Ramdev Baba) यांच्या एका विधानामुळे संपूर्ण संमेलनात हशा पिकली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, काही घातलं नाही तरी चांगल्या दिसतात, असे वक्तव्य बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी संमेलनात केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर, ‘अमृता फडणवीसांची तरुण राहण्याची प्रबळ इच्छा आहे, त्या शंभर वर्षापर्यंत म्हाताऱ्या होणार नाहीत. त्या नेहमीच मापून खातात, खुश राहतात, जेव्हा पाहावं तेव्हा लहान मुलांप्रमाणे हसत असतात,’ असे योगगुरु रामदेव बाबा अमृता फडणवीसांना म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही रामदेव बाबांनी कौतुक केले.
“महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विराट व्यक्तिमत्त्व आहे, तर एकनाथ शिंदे यांच्यासारखे ऊर्जावान व्यक्ती आहे,
शिंदे-फडणवीस एकत्र येऊन नवनिर्मिती करत आहेत.
या दोघांनी मिळून इतिहास रचला आहे, आणि रचत राहणार आहेत.
जेव्हा माझी झोप झालेली असते तेव्हासुद्धा एकनाथ शिंदे यांना झोपायला वेळ मिळत नाही, एवढा त्यांचा पुरुषार्थ आहे.
त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.” असे रामदेव बाबा म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Yoga Guru Ramdev Baba | yoga guru ramdev baba on women wearing saree amruta fadnavis cm eknath shinde devendra fadnavis

हे देखील वाचा :

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने बोम्मई यांना पुढे करुन सीमावादाचा प्रश्न काढला’

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोरघाटात कंटेनरने 6 गाड्यांना उडवलं

Related Posts