IMPIMP

Zerodha New Feature | कामाची बातमी ! Zerodha चे अकाऊंट होल्डर्स आता आपल्या 10 फॅमिली मेंबर्सचा पोर्टफोलियो करू शकतील ट्रॅक

by nagesh
Zerodha New Feature | zerodha new feature allows investors to add family members portfolios

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाZerodha New Feature | बेंगळुरू येथील ऑनलाइन ब्रोकरेज फर्म झेरोधाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फीचर आणले आहे. तुमचे या डिस्काउंट ब्रोकर फर्ममध्ये खाते असल्यास, तुम्ही कन्सोलवरील फॅमिली पोर्टफोलिओ व्ह्यूद्वारे 10 फॅमिली पोर्टफोलिओचा मागोवा घेऊ शकता. (Zerodha New Feature)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

झिरोधाचे सह-संस्थापक (Co-founder) नितीन कामत म्हणाले की, ग्राहकाला संपूर्ण कुटुंबाचा पोर्टफोलिओ पाहण्यास मदत करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. हे वैशिष्ट्य त्यांच्या वडिलांच्या संघर्षाचे फळ आहे.

स्टॉक ब्रोकर फर्म झेरोधाने कन्सोलवर फॅमिली पोर्टफोलिओ व्ह्यू सादर केला आहे, ज्याद्वारे गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कुटुंबातील 10 सदस्य जोडू शकतात. याद्वारे तुम्ही तुमच्या एकत्रित पोर्टफोलिओचा झेरोधावरील एका खात्यातून मागोवा घेऊ शकता. (Zerodha New Feature)

कामत यांनी आपल्या ट्विटवर लिहिले आहे की, त्यांच्या वडिलांनी बँक व्यवस्थापक म्हणून संपूर्ण कारकीर्दीत शेअर्स, म्युच्युअल फंड, विमा यामध्ये गुंतवणूक केली, विविध संस्थांच्या सेवा घेतल्या आहेत. ते म्हणाले, एका ब्रोकरेज फर्ममध्ये काम करत असूनही अनेक प्रयत्न करूनही मी त्यांना त्यांची गुंतवणूक एकाच ठिकाणी आणण्यात आणि व्यर्थ गुंतवणुकीतून बाहेर पडण्यात अपयशी ठरलो आहे.

ऑर्डर प्लेस करू शकत नाही

लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, एकत्रित पोर्टफोलिओ सर्व खात्यांमधील मालमत्ता वाटप, एक्सपोजर आणि क्षेत्रे प्रतिबिंबित करतो. झेरोधाने स्पष्ट केले आहे की अधिकृततेनंतरच कुटुंबातील सदस्यांची खाती पाहण्याची आणि ट्रॅक करण्याची परवानगी आहे.

एवढेच नाही तर, एका खात्याला दुसर्‍याच्या वतीने खरेदी-विक्रीच्या ऑर्डर देण्याची परवानगी नाही. दुसरे खाते कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे असले तरीही. याचा अर्थ असा की तुम्ही दुसर्‍याच्या खात्यातून ऑर्डर देऊ शकणार नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या स्टेप करा फॉलो

झेरोधाची वेबसाइट kite.zerodha.com/holdings उघडा आणि Family वर क्लिक करा.

तुम्हाला थेट कन्सोलवर नेले जाईल. त्यानंतर तुम्ही सब-अकाऊंटच्या लिंकवर क्लिक करा.

सब अकाऊंटचा काईड युजर आयडी, सब-अकाऊंटचा पॅन आणि मोबाइल क्रमांक नोंदवा. त्यानंतर कंटीन्यू वर क्लिक करा.

मोबाईलवर येईल एसएमएस

व्हेरिफाय लिंकसह एक एसएमएस सब-अकाऊंट होल्डरच्या मोबाइलवर पाठविला जाईल.
सब-अकाऊंट होल्डरला एसएमएसमधील पडताळणी लिंकवर क्लिक करून परवानगी द्यावी लागेल.
ही विनंती पाठवणार्‍याला तुमचा पोर्टफोलिओ पाहण्याची अनुमती देईल. व्हेरिफिकेशन लिंक फक्त 2 तासांसाठी वैध असेल.

Web Title :- Zerodha New Feature | zerodha new feature allows investors to add family members portfolios

हे देखील वाचा :

Lok Sabha Election 2024 | भाजपकडून ‘मिशन 48’ ची घोषणा ! 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी

Medium Spicy | मल्टीस्टारर “मीडियम स्पाइसी” मध्ये राधिका आपटेची धमाकेदार एंट्री

Business Idea | अतिशय कमी गुंतवणुकीत घराच्या छतावर सुरू करा हा बिझनेस, लाखो रूपयांची होईल कमाई

Related Posts