IMPIMP

Blinkit सोबतच्या डीलनंतर Zomato च्या शेअरची स्थिती बिकट, 9 टक्केपेक्षा जास्त घसरून येथे पोहचला भाव

by nagesh
Zomato-Blinkit | zomato share fall more than 6pc after blinkit deal check latest update

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाZomato-Blinkit | कोरोनाच्या काळात ऑनलाइन फूड बिझनेस (Online Food Business) झपाट्याने वाढला आहे आणि आता ऑर्डर केलेल्या अन्नासह इतर घरगुती वस्तूंच्या त्वरित डिलिव्हरी करण्याची मागणी वाढली आहे. यामुळेच Zomato आता या व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित करत आहे आणि 4,447 कोटी रुपयांना Blinkit विकत घेणार आहे. (Zomato-Blinkit)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मात्र या डीलचा कंपनीच्या शेअर्सवर वाईट परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांच्या तेजीनंतर सोमवारी कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांहून अधिक घसरले.

वाढीसह केली होती सुरुवात

झोमॅटो-ब्लिंकिट डील शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यानंतर शेअर बाजार (Stock Market) उघडला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर झोमॅटोचा स्टॉक कोसळला.

आज दुपारी 12.15 वाजेपर्यंत कंपनीचा शेअर घसरून 61.35 रुपयांवर आला होता. दिर्घकाळ घसरण पाहिल्यानंतर, अलिकडेच या शेअरमध्ये सुधारणा दिसून आली होती, परंतु या ब्लिंकिटसोबतच्या करारावर शिक्कामोर्तब होताच त्याच्या घसरणीचा ट्रेंड पुन्हा सुरू झाला.

2021 मध्ये युनिकॉर्न बनली Blinkit

ब्लिंकिट पूर्वी ग्रोफर्स म्हणून ओळखली जात होती.
झोमॅटो क्विक कॉमर्समध्ये आपला विस्तार वाढवण्यासाठी एप्रिल 2020 पासून ग्रोफर्स खरेदी करण्यावर विचार करत आहे.

तेव्हा कंपनीने ग्रोफर्ससमोर 75 कोटी डॉलर व्हॅल्यूएशनची ऑफर ठेवली होती.
मात्र, जून 2021 मध्ये, ग्रोफर्सने अधिक निधी उभारला आणि एक युनिकॉर्न कंपनी बनली. यानंतर तिचे नाव बदलून ब्लिंकिट करण्यात आले. (Zomato-Blinkit)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

20 हून अधिक शहरांमध्ये पसरला व्यवसाय

झोमॅटोने गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच ब्लिंकिटमधील 9% हिस्सा खरेदी केला होता.
तेव्हा कंपनीने यासाठी 518 कोटी रुपयांचा करार केला होता.
ब्लिंकिट सध्या देशातील 20 हून अधिक शहरांमध्ये काम करते आणि लोकांना 10 मिनिटांत रेशन डिलिव्हरी देण्याचे काम करते.

तर झोमॅटोने अलीकडेच 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी करण्याची घोषणा केली आहे.
अशा परिस्थितीत दोन्ही कंपन्यांसाठी ही डील अनेक अर्थाने मोठी आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Zomato-Blinkit | zomato share fall more than 6pc after blinkit deal check latest update

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | 8 कॅबिनेट मंत्री – 5 राज्यमंत्री; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ! भाजपासोबत ‘या’ फॉर्म्युलावर सरकार बनवण्याची तयारी

MP Sanjay Raut | ‘…अन्यथा फडणवीसांसह मोदींची प्रतिष्ठाही धुळीस मिळेल’ – संजय राऊत

MP Pratap Patil Chikhlikar | ‘राज्यात येत्या 2-3 दिवसात भाजपचे सरकार येईल, फडणवीस मुख्यमंत्री होतील’; भाजप खासदाराचं मोठं विधान

Related Posts