IMPIMP

Corona Vaccination in Maharashtra | राज्याने नोंदवली लसीकरणाचा नवा विक्रम !

by bali123
Corona Vaccination in Maharashtra | maharashtra sets new record in corona vaccination

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination in Maharashtra) करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत आज स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पूर्वसंध्येला राज्याने एक विक्रम नोंदवली आहे. दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत 9 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण (Corona Vaccination in Maharashtra) करण्यात आले आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची ही पहिलीच वेळ असून आजवरचा हा सर्वाधिक आकडा आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. दिवसाला किमान दहा लाख लसीकरण करण्याची क्षमता राज्याची असून आज झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे. यापुढे असेच विक्रमी संख्येने लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा (Health system) प्रयत्नशील राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas) यांनी सांगितले की, आज सायंकाळी सात वाजेपर्यंत 9 लाख 36 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
यामध्ये वाढ होऊ शकते. यापूर्वी 3 जुलै रोजी 8 लाख 11 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते.
त्यावेळी लसीकरणाचा विक्रम नोंदवण्यात आला होता.
मात्र, आज तो विक्रम मोडित निघाला असून नवा विक्रम झाला असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

Web Title : Corona Vaccination in Maharashtra | maharashtra sets new record in corona vaccination

Pune Inspector Transfer | पुण्यामधील विविध पोलीस अस्थापनांवरील 45 पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या, काही जणांना मुदतवाढ

Maharashtra Police Transfer | राज्यातील बहुप्रतिक्षित पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त; 1462 पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या ‘ट्रान्सफर’

Shikhar Bank Scam Case | शिखर बँक घोटाळयाबाबत शालिनीताईंचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘थोरल्यासह धाकटया पवारांचा हात’ 

Related Posts