IMPIMP

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 8,326 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by bali123
Coronavirus in Maharashtra | 8,326 patients 'corona' free in last 24 hours in the state, find out other statistics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (रविवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज 3,413 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8,326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यात आतापर्यंत 63 लाख 36 हजार 887 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.16 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 42 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 70 लाख 28 हजार 476 प्रयोगशाळा
नमुन्यांपैकी 65 लाख 21 हजार 915 (11.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 81 हजार 561 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,752 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Titel :- Coronavirus in Maharashtra | 8,326 patients ‘corona’ free in last 24 hours in the state, find out other statistics

Related Posts