IMPIMP

‘या’ आमदाराने कोरोना पॉझिटिव्हचं दाखवलं निगेटिव्ह; अजित पवार भडकले

by amol
false report of corona test ajit pawar lashed out at the mlc

मुंबई : Ajit Pawar राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. मात्र, या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी सदस्यांना कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचे दाखवणे बंधनकारक आहे. जर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर संबंधितांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, सभागृहातील कामकाजात सहभागी होण्यासाठी एका आमदाराने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हचे निगेटिव्ह असल्याचे दाखवल्याची माहिती समोर आली आहे.

विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असतानाही सभागृहात आले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. प्रशांत परिचारक यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना तो निगेटिव्ह करून देण्यात आला असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर यावर उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar हे चांगलेच भडकले आहेत. अजित पवार Ajit Pawar यांनी या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी सभापतींकडे केली.

दरम्यान, प्रशांत परिचारक यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यामध्ये ते म्हणाले, 28 फेब्रुवारीला माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी मी पुन्हा चाचणी केली असता, अहवाल निगेटिव्ह आला. एकदा नव्हे तर सलग तीन वेळा माझ्या चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतरच मी सभागृहात हजर राहिलो.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts