IMPIMP

प्रेमविवाहानंतर सहाच महिन्यांत पत्नीला संपवलं, पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघडकीस

by pranjalishirish
murder-of-wife-just-six-months-after-the-love-marriage-but-police-reveals-murder-case

कर्जत : सरकारसत्ता ऑनलाइन – प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत पत्नीचा खून murder केल्याची धक्कादायक घटना जागतिक महिलादिनी घडली. पत्नीचा खून murder केल्यानंतर आत्महत्या असल्याचे भासवणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

नेहा शंकर साळवे असे खून murder झालेल्या महिलेचे नाव आहे, तर शंकर किशोर साळवे (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शंकर आणि करमाळा तालुक्यातील नेहा या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर या दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. याच रागातून केलेल्या मारहाणीत नेहाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी शंकर याने नेहाने आत्महत्या केल्याचा बनाव केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नेहा आणि आरोपी शंकर यांचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. 8 मार्च रोजी दुपारी दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात शंकर याने नेहाला बेदम मारहाण केली. मारहाणीत नेहाच्या डोक्याला मार लागला. यामध्ये गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
यानंतर आरोपी शंकर याने नेहाची बहीण दीक्षा हिला फोन करून नेहाने आत्महत्या केल्याची माहिती दिली.

दरम्यान, शंकर याने नेहाला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांना नेहाने आत्महत्या केल्याचे सांगितले. डॉक्टरांनी या घटनेची
माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांना संशय आल्याने त्यांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात नेहाच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी शंकर साळवे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Related Posts