IMPIMP

अखेर मुहूर्त ठरला अन् सरपंच-उपसरपंचाचा जीव भांड्यात पडला ! पुणे जिल्ह्यातील 269 ग्रामपंचायतींवर गावकारभाऱ्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

by sikandershaikh
sarpanch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका (gram panchayat Election) झाल्या, निकालही जाहीर झाले. मात्र ऐनवेळी माशी शिंकली आणि 269 गावच्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे चार तालुक्यातील निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. येत्या 24 व 25 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तालुक्यांमधील 269 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून, लवकरच गावकारभारी गावच्या विकासकामाला प्रारंभ करतील, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पुणे, जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (gram panchayat Election) 15 जानेवारीला झाल्या होत्या. या निवडणुकीचे निकाल 18 जानेवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर 29 जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते.

निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेच 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी सरपंच उपसरपंचांच्या निवडणुका होणार होत्या.
परंतु राज्य सरकारने निवडणूक निकालानंतर जाहीर केलेल्या सरपंच आरक्षणाला काही गावांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
याबाबत राज्यभरातून सुमारे 35 आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या.
या याचिकांवरील सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नव्याने सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.
या आदेशानुसार पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी 9 फेब्रुवारीला यावर सुनावणी घेतली होती.

बारामती तालुक्यातील निंबूत, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, मावळ तालुक्यातील परंदवडी आणि खेड तालुक्यातील मेदनकरवाडी,
नाणेकरवाडी आणि बिरदवडी या गावांमधील काही ग्रामस्थांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या.
या चार तालुक्यातील निवडणूक झालेल्या सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडींना स्थगिती मिळाली होती.

Related Posts