IMPIMP

Ram Mandir : शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी 5 लाखांची देणगी

by sikandershaikh
Ram Mandir

डोंबिवली : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिर (Ram Mandir, Ayodhya) उभारणीत सक्रिय सहभाग घेत 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. डोंबिवली येथील गणेश मंदिरचे विश्वस्त मधुकर चक्रदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुरेश फाटक, प्रदीप पराडकर यांच्याकडे शिंदेंनी 5 लाखांचा धनादेश सुपूर्त केला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात मलाही राम मंदिर उभारणीच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य प्राप्त झालं अशी भावनिक प्रतिक्रिया देखील दिली.

सध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करण्याचं अभियान सुरू आहे.
यासाठी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून 10 अब्ज रुपये जमा करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा निर्धार आहे.
देशभरातून लोक या मंदिरासठी देणगी देताना दिसत आहेत.

राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधाकामाला सुरुवात झाली असून ते 1000 वर्ष टिकावे या हेतूनं दगड आणि तांब्याचा उपयोग करत त्याचं बांधकाम केलं जाणार आहे.
या मंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडलं होतं.

‘हे’ महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या भाज्यपालांनी समजून घेतलं पाहिजे, शिवसेनेची टीका

वरिष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा ‘आहेर’, म्हणाले- ‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’

Maharashtra Politics : ‘मार्च-एप्रिल’मध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप ?, शिवसेनेचा भाजपला गंभीर इशारा

शिवसेनेचा भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, जबाबदारीचे भान राखा

चंद्रकांत पाटलांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘आव्हान’, म्हणाले – ‘GST चे पैसे आले आता विकास करूनच दाखवा’

Related Posts