IMPIMP

सुशांत ड्रग्ज केस ! NCB च्या चार्जशीटमध्ये 33 आरोपींची नावे, 200 पेक्षा जास्त साक्षीदारांचा समावेश

by sikandershaikh
sushant singh rajput death case

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्या प्रकरणात NCB ने आज कोर्टात चार्टशीट दाखल केली आहे. एनसीबीचे चीफ अमीर वानखेडे स्वतः कोर्टात चार्टशीट दाखल करण्यासाठी गेले. चार्टशीट एकूण ५२ हजार पानांची होती ज्यामध्ये ४० हजार पाने सॉफ्ट कॉपीमध्ये होते आणि १२ हजार पाने हार्ड कॉपीमध्ये होते. या चार्जशीटमध्ये एकूण २०० साक्षीदारांचा उल्लेख केला आहे.

चार्जशीटमध्ये ३३ आरोपींची नावे

NCB च्या चार्जशीटमध्ये रिया चक्रवर्तीसोबत ३३ लोकांचे नाव आरोपी म्हणून सामील केले गेले आहे. यामध्ये रिया, शोविक, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा आणि क्षितिज प्रसाद यांची नावे आहेत. सद्या पकडल्या गेलेल्या ड्रग्ज पॅड्लरचे नाव, याशिवाय रियाचे जवळचे आणि अनेक ड्रग्ज पॅड्लर सप्लायर यांची नावे चार्टशीटमध्ये आरोपी म्हणून सामील केले आहेत. आरोपीना NCB ने पकडले होते.

NCB च्या येण्याने वाढली होती शोधगती

ड्रग्ज जप्त केल्याचा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याच्या अहवालावर चार्टशीट तयार केली आहे. सुशांत केसच्या तपासादरम्यान ED ला ड्रग्जशी संबंधित चॅट मिळाली होती. त्यानंतर ED ने ती चॅट NCB कडे सुपूर्द केली. त्यांतर केसमध्ये NCB ची एन्ट्री झाली आणि तपासाची गती वाढली.

सुशांत प्रकरणामुळे लागली ड्रग्ज प्रकणांना आग

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) सुसाईड केसच्या चौकशीची सुरवात मुंबई पोलिसांकडे होती.
काही दिवसांनंतर या केसला नाटकाचे स्वरूप आले.
मुंबई पोलिसानंतर या प्रकरणाची चौकशी बिहार पोलिसांकडे आली आणि याला सीबीआयकडे टेकओव्हर केले गेले.
केसमध्ये जेव्हा मनी लॉन्ड्रींग ऍंगल आला तेव्हा यात ED ची एन्ट्री झाली आणि जेव्हा ड्रग्जशी संबंधीत चॅट मिळाली तेव्हा NCB ची एन्ट्री झाली.

सर्वात आधी NCB ने रियाला अटक केली

NCB ने सर्वात आधी रियाला अटक केली आहे.
रियाचा भाऊ शोविकजवळून ड्रग्ज मिळाल्यानंतर त्याने काबुल केले की, तो आणि त्याची बहीण सुशांतला ड्रग्ज प्रोक्योर करत होते.
त्यामुळे रिया काही काळ ताब्यात राहिली होती. तिला जामीन देऊन सोडवण्यात आले.
आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर खळबळजनक स्थिती होत असल्याचे दिसत आहे.

जळगावच्या वसतिगृहात गैरकृत्य नसल्याचे गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘गरम होत असल्याने तिने घागरा काढला’

Related Posts