IMPIMP

BSNL ग्राहकांनो सावधान ! एक SMS करू शकतो तुमचं अकाउंट ‘रिकामे’

by bali123
bsnl sms bank fraud alert bsnl asks users now to give personal information can entrap into sms fraud

नवी दिल्ली : सध्या ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक व्यवहार करताना योग्य ती काळजी घेऊन करावे लागणार आहे. जर तसे नाही केले तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. बँकांकडूनही ग्राहकांसाठी वेळोवेळी अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात असतात. पण तुम्ही bsnl चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

आता bsnl च्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. कंपनीने ग्राहकांना एका SMS फ्रॉडवरून अलर्ट केले आहे. त्यानुसार, कंपनीकडून सांगण्यात आले, की ग्राहकांनी आपली वैयक्तिक माहिती SMS द्वारे देऊ नये. SMS च्या माध्यमातून KYC डिटेल्स यूजर्सकडून माहिती घेऊन त्यांच्या बँकातील पैसे चोरून घेतले जाऊ शकतात. त्यामुळे आता अलर्ट होणे गरजेचे आहे.

अशी केली जाते फसवणूक…
फ्रॉड करणारे लोक bsnl कर्मचाऱ्याचे नाव सांगून करतात कॉल
KYC डिटेल्स नसल्याचे सांगून तुमचे सीम कार्ड सस्पेंड केलं जातंय असंही सांगतात.
फ्रॉड करणारे यूजर्सच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी SMS च्या माध्यमातून KYC डिटेल्सचा करतात वापर.
CP-BLMKND, CP-SMSFST, BP-ITLINN आणि AD-VIRINF अशाप्रकारे येणाऱ्या मेसेजला देऊ नका रिप्लाय.

तणावाच्या दिवसांमध्ये आहारात समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, डोक राहिल एकदम शांत, जाणून घ्या

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts