IMPIMP

Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड तेजी, जाणून घ्या आजचे दर

by omkar
gold price today on 20th august 2021 gold and silver rates hike on friday

सरकारसत्ता ऑनलाइन –

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी उसळी पहायला मिळत आहे. कोरोना संकटाची तीव्रता कमी झाली असून मौल्यवान धातूंना मागणी वाढली आहे. आज सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांच्या जवळपास पोहचली आहे. तर चांदीचा दर देखील 72 हजार रुपये प्रति किलोपेक्षा अधिक झाला आहे. MAX (Multi Commodity Exchange) वर आज (मंगळवार) चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईलa वेगाने घट

मागील दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 हजार रुपयांची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मार्च महिन्यात सोन्याचे दर 44 हजार रुपये प्रति तोळापेक्षाही कमी झाले होते. मागील आठवड्यात नफावसुलीची झळ बसलेल्या सोने आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीचा भाव वाढला आहे. (Gold-Silver Price)

सोने-चांदीचे नवे दर

– MCXवर आज सोन्याच्या किंमतीत तेजी पहायला मिळाली. सोन्याचे दर 0.20 टक्क्यांनी वाढून 49 हजार 450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत.
– चांदीमध्ये 0.84 टक्क्यांच्या तेजीनंतर दर प्रति किलो 72 हजार 503 रुपयांवर पोहोचले आहेत.
– आधीच्या सत्रात सोन्यामध्ये 0.45 टक्के तर चांदीमध्ये 0.42 टक्क्यांची तेजी आली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातील दर

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर गेल्या पाच महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,911.45 डॉलर प्रति औंस झाली आहे. चांदीची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढून 28.22 डॉलर प्रति औंस तर प्लॅटिनमच्या दरात 0.5 टक्क्यांनी वाढ होऊन दर 1,922.22 डॉलर झाले आहेत. (Gold-Silver Price)

सोन्याचे दर आणखी वाढणार

तज्ज्ञांच्या मते सोने-चांदीच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस हे सोन्याच्या किंमती वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरु शकते. कारण या काळात गुंतवणुकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे अधिक वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे वाढले सोने-चांदीचे दर

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, रुपयाच्या तुलनेत डॉलर मध्ये मजबुती आल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. तर न्यूयॉर्क कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर स्पॉट गोल्डच्या किंमतीतही वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे देखील देशांतर्गत सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Also Read:- 

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’ ! लसीकरणावरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी?

किरीट सोमय्यां(Kirit Somaiya)नी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले…

Maratha Reservation : 3 पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; गिरीश महाजनांची टीका

Related Posts