IMPIMP

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

by pranjalishirish
epfo starts new services pf holder now complaints will be resolved through whatsapp see here number

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – पीएफ खातेधारकांसाठी PF   एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने कर्मचार्‍यांसाठी नवी सेवा सुरू केली आहे. ईपीएफओने आपल्या पीएफ खातेधारकांसाठी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन सेवा WhatsApp helpline  सुरू केलीय. याद्वारे आता पीएफ खातेदार त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व अडचणी दूर करण्यास सक्षम असतील. या सेवा कर्मचार्‍यांना ईपीएफओ कार्यालयात भेट द्यावी लागणार नाही.

ईपीएफओची ही व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन सेवा WhatsApp helpline  138 प्रादेशिक कार्यालयांत सुरू झालीय. ईपीएफओ खातेदार व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात. प्रत्येक प्रदेशाची संख्या भिन्न आहे. आपल्या परिसराचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाणून घेण्यासाठी आपण Https://Www.Epfindia.Gov.In/Site_docs/PDFs/Downloads_PDFs/WhatsApp_Helpline.Pdf या लिंकवर क्लिक करा.

ईपीएफओ व्यतिरिक्त पीएफ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक हि पाहिले जाऊ शकतात. ज्यात ईपीएआयजीएमएस (ऑनलाईन कंप्लेंट रेझोल्यूशन पोर्टल), सीपीजीआरएएमएस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (फेसबुक आणि ट्विटर) आणि 24 तास कॉल सेंटरचाही समावेश आहे. त्यामुळे पीएफ खातेधारकांसाठी या सर्व सुविधा सुरू केल्या असून ते याचा लाभ घेऊ शकतात.

ईपीएफओचा असा प्रयत्न आहे की, लोकांचे मेहनतीचे पैसे पीएफमधून काढून देण्यासाठी त्यात एजंटगिरी होऊ नये. काही वेळेस असे काही एजंट अथवा मधस्थी त्यांच्या पीएफच्या पैशावर डोळा ठेऊन असतात. अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा एखादा पीएफधारक पीएफ कार्यालयात जातो, तेव्हा तो तेथील मध्यस्थांच्या चक्रव्यूहमध्ये अडकतो किंवा अडकण्याची शक्यता अधिक असते. म्हणून सर्व पीएफ खातेदारांनी त्यांचे प्रश्न ऑनलाईनद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे सरकारचे म्हणणे आहे. यामुळे त्यांना कष्टाचे पैसे मिळतील, त्यांचा वेळही वाचेल. तसेच पीएफ मिळाल्यामुळे त्यांचा विश्वास आणखी वाढेल.

Also Read : 

WB Elections : ममतादीदींकडून आश्वासनांची बरसात

Related Posts