IMPIMP

1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे?

by omkar
Financial Planning

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन –  कोरोना काळात लोकांचा कल पुन्हा एकदा फायनान्शियल प्लॅनिंग(Financial Planning) कडे जास्त झाला आहे. फायनान्शियल प्लॅनिंग (Financial Planning) जीवनातील महत्वाच्या कामांपैकी एक आहे.
व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट रणनीती अशी असावी की कोणत्याही छोट्या-मोठ्या कामासाठी मित्र-नातेवाईकांकडून उधार किंवा बँकेकडून कर्ज घ्यायला लागू नये.
आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका अशा स्कीम बाबत सांगणार आहोत जिने मागील एका वर्षात 60 टक्केपर्यंत रिटर्न दिले आहे. या स्कीमबाबत जाणून घेवूयात…

Mahatma Phule Mandai Fire | पुण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

ही आहे नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)
नॅशनल पेन्शन स्कीम विशेषता रिटायर्मेंटसाठी डिझाईन केलेले दिर्घ कालावधीचे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे. याची देखरेख पेन्शन फंड नियामक पीएफआरडीए करते.
नॅशनल पेन्शन सिस्टमची स्कीम-ई ने इक्विटी बाजाराला मोठा फायदा दिला आहे.
मागील एक वर्षात सरकारच्या पेन्शन योजनेने 60 टक्केपर्यंतचा रिटर्न दिला आहे.

एनपीएस पेन्शन फंडने दिला 60% रिटर्न
एनपीएसच्या टियर-1 खात्यात एलआयसी पेन्शन फंडने सर्वात जास्त 59.56 टक्के रिटर्न दिला आहे. यानंतर आयसीआयसीआय प्रू पेन्शन फंडने 59.47 टक्के आणि यूटीआय रिटायर्मेंट सोल्यूशन्सने 58.91 टक्के रिटर्न दिला आहे.

Ajit Pawar | ‘मला अशा कामाच्या पाहणीला बोलवलं तर मी लई बारीक बघत असतो, माझ्या भाषेतच सांगायचं तर हे ‘छा-छु काम’ आहे’

जाणून घ्या टियर-1 आणि टियर-2 मधील फरक
एनपीएस टियर-1 अकाऊंट अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी वार्षिक किमान योगदान 6,000 रुपयावरून कम करून केवळ 1,000 रुपये केल आहे.
रिटायर्ड झाल्यानंतर सर्व रक्कमेचा 60 टक्के भाग एकरकमी टॅक्स फ्री घेऊ शकता.
इतर 40 टक्के फंडमधून आयुष्यभर पेन्शन घेऊ शकता.

एनपीएस टियर-2 मध्ये अनेक प्रकारच्या सवलती आहेत.
कारण, हे इन्व्हेस्टमेंट अकाऊंट आहे, तुम्ही तुमच्या गरजेच्या हिशेबाने पैसे काढू शकता.
मात्र, सरकारी कमचारी वगळता टियर-2 अकाउंट्सवर इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या सेक्शन 80सी अंतर्गत कोणताही टॅक्स लाभ मिळत नाही.
एनपीएसच्या टियर 1 खात्यात तुमचे वय 60 वर्षापर्यंत लॉक-इन आहे, जोपर्यंत तुम्ही ते वाढवत नाही. परंतु टियर 2 खात्यासाठी कोणताही लॉक-इन कालावधी नाही.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

Related Posts