IMPIMP

घर खरेदीदारांसाठी SBI ची जबरदस्त ऑफर, गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क ‘माफ’

by sikandershaikh
SBI Tax Saving Scheme | sbi fd scheme how much you will gain on maturity with 5 lakh rupees lump sum deposit check tax benefits and other details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनhome loan sbi interest rate | घर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी देशातील सर्वात मोठी सहकारी बॅंक म्हणून ओळखल्या जाणा-या भारतीय स्टेट बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करत सर्वात कमी व्याज दराची घोषणा केली आहे. या बॅंकेचे गृहकर्ज वार्षिक 6.80% पासून सुरू होते. इतर बँकांच्या तुलनेत एसबीआयचा व्याज दर खूपच कमी आहे.

एवढेच नाही तर बॅंकेने विविध प्रकारचे कर्ज ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यात नियमित गृह कर्ज, सरकारी कर्मचार्‍यांसाठी एसबीआय विशेषाधिकार गृह कर्ज, सैनिकांसाठी शौर्य गृह कर्ज, एसबीआय मॅक्सगेन होम लोन, एसबीआय स्मार्ट होम, टॉप-अप कर्ज, एसबीआय एनआरआय होम लोन आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच एसबीआय फ्लेक्सी पे होमलोन आणि महिलांसाठी एसबीआय हरघर होम लोन कर्ज जर तुम्हाला घ्यायच असेल तर यासाठी मोबाईल नंबर 7208933140 दिला आहे. ज्यावर तुम्ही मिस्ड कॉल देऊन संपूर्ण माहिती मिळू शकते. दरम्यान गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क माफीची घोषणा केल्याने घर खरेदीदारांचा उत्साह वाढेल आणि मालमत्तेत गुंतवणूक करायची इच्छा निर्माण होईल, असा आशावाद बॅकेने व्यक्त केला आहे.

Related Posts