IMPIMP

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

by omkar
Income Tax

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – इन्कम टॅक्स, (Income Tax ) आधार कार्ड (Aadhar Card) ला पॅनकार्डशी लिंक करणे, बँकिंगसह अनेक महत्वाची कामे आहेत, जी कोणत्याही स्थितीत 30 जून 2021 पूर्वी पूर्ण केली पाहिजेत. अन्यथा तुम्हाला मोठा भुर्दंड भरवा लागू शकतो. इतकेच नव्हे, बँकेचा व्यवहार करण्यात सुद्धा समस्या येऊ शकते. बँक अकाऊंट सुद्धा बंद होऊ शकते. 30 जूनपूर्वी कोण-कोणती कामे करणे अतिशय आवश्यक आहे ते जाणून घेवूयात…

मुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट

Adhaar-PAN लिंक
जर तुम्ही अजूनपर्यंत पॅनकार्डला आधारशी लिंक केले नसेल तर आजच करा.
तुमच्याकडे आता केवळ 30 जूनपर्यंतचा वेळच शिल्लक आहे.
इन्कम टॅक्स विभागाने पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची डेडलाईन 30 जून 2021 ठरवली आहे.
यानंतर सुद्धा ज्या लोकांचे पॅन लिंक होणार नाही त्यांना 1 हजार रुपये दंड द्यावा लागेल.
या सोबतच पॅन निष्क्रिय केले जाईल.

SBI ग्राहकांचे बंद होऊ शकते कार्ड
जर तुम्ही सुद्धा एसबीआयचे ग्राहक आहात तर 30 जूनपूर्वी पॅन कार्डला आधारशी लिंक केले नाही तर बँकेत 1000 दंड भरावा लागेल.
सोबतच बँकेच्या सुरू असलेल्या सुविधा सुद्धा बंद होऊ शकतात.

सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ ! 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे दर

द्यावा लागू शकतो दुप्पट TDS
टॅक्सपेयर्ससाठी अतिशय महत्वाची बातमी आहे.
30 जूनपूर्वी आपला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा.
अन्यथा 1 जुलैपासून टॅक्सपेयर्सला जास्त टीडीएस भरावा लागू शकतो.
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर केली आहे.

पीएम किसानच्या रक्कमेसाठी रजिस्ट्रेशन करा
दुप्पट लाभ मिळवण्यासाठी 30 जूनपर्यंत पीएम किसान योजनेंतर्गत आपले रजिस्ट्रेशन आवश्य करा.
जेणेकरून पुढील हप्ता तुमच्या खात्यात थेट येईल.
30 जूनपर्यंत रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या खात्यात 4,000 रुपये येतील.

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

30 जूनपूर्वी नवीन IFSC कोड घ्या
सिंडिकेट बँक ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे.
सिंडिकेट बँकेचे एक एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत विलीनीकरण झाले आहे.
यासाठी आता 1 जुलैपासून बँकेचा आयएफसी कोड बदलणार आहेत.
अशावेळी सिंडिकेट बँकेच्या शाखांचे सध्याचे आयएफसी कोड 30 जून 2021 पर्यंत काम करतील. नंतर नवीन कोड लागू होतील.

Monsoon | Weather Alert ! पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार

SBI, HDFC सह अनेक बँका बदलत आहेत नियम
तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा सिनियर सिटीजन्सला स्पेशल एफडीची ऑफर देत आहेत.
जी 30 जून 2021 ला बंद होणार आहे.
बँक सिनियर सिटीजन्ससाठी मे 2020 मध्ये खास ऑफर घेऊन आली होती.
ही ऑफर होती सिलेक्टेड मॅच्युरिटी पिरियडच्या एफडीमध्ये सिनियर सिटीजन्सला लागू व्याजदरावर 0.50 टक्केपर्यंत जादा व्याजाची.
म्हणजे रेग्युलर कस्टमर मिळणार्‍या व्याजापेक्षा 1 टक्के जास्त व्याज.

Husband Killed Wife | नवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला

Related Posts