IMPIMP

SBI देतंय मिस्ड कॉल आणि SMS वर 20 लाखापर्यंतचे ‘लोन’, व्याज अतिशय कमी !

by sikandershaikh
SBI Tax Saving Scheme | sbi fd scheme how much you will gain on maturity with 5 lakh rupees lump sum deposit check tax benefits and other details

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आता एका मिस्ड कॉलवर किंवा एका मॅसेजवर 20 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन देण्याची घोषणा केली आहे. Xpress Credit Personal Loan नावे ही सुविधा सुरू केली आहे.

बँकेचे म्हणणे आहे की, एक्स्प्रेस क्रेडिट पर्सनल लोन च्या अंतर्गत ग्राहकांना ताबडतोब लोन अप्रूव्ह होईल. कारण अतिशय कमी कागदपत्रांची आवश्यकता असेल. सर्वात खास गोष्ट ही आहे की, बँक हे पर्सनल लोन 9.60 वार्षिक व्याजदराने देत आहे.

जर तुम्हाला एसबीआयकडून हे पर्सनल लोन (credit personal loan) हवे असेल तर यासाठी काही अटी आहेत. एसबीआयचे हे लोन अशा खातेधारकांसाठी आहे, ज्यांचे सॅलरी अकाऊंट एसबीआयमध्ये आहे.

या लोनचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांचे मासिक उत्पन्न किमान 15 हजार रुपये असावे.
जर तुमची सॅलरी किमान 15 हजार रुपये असेल तर तुम्ही या लोनसाठी अर्ज करू शकता.
या पर्सनल लोनचा लाभ घेण्यासाठी केवळ तुमच्या मोबाईल नंबरवरून 7208933142 वर मिस्ड कॉल करा.
यानंतर बँक प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल.

हिच सुविधा एका एसएमएसद्वारे सुद्धा मिळेल, आपल्या मोबाइलवर PERSONAL लिहून 7208933145 वर मॅसेज करा. नंतर बँकेकडून पूर्ण माहिती दिली जाईल.

बँकेनुसार, ग्राहक किमान 25 हजार रुपये आणि कमाल 20 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी अर्ज करू शकतात. दैनिक शिल्लक रक्कमेवर व्याज लागेल.
यासाठी कोणतीही सिक्युरिटी किंवा गॅरंटीची आवश्यकता नसेल. स्कीमसाठी अतिशय कमी प्रोसेसिंग फी लागेल.
तसेच अतिशय कमी कागदपत्र ग्राहकांकडून मागितली जातील.

Related Posts