IMPIMP

Mumbai News : पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, पतीचा जीम मालकावर अ‍ॅसिड हल्ला

by amol
Amravati News | shooting youth old argument gadgenegar police registered case against 5 persons

विरार : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने एका जीम मालकावर अ‍ॅसिड हल्ला (Acid attack) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीचे आणि जीम मालकासोबत अनैतिक संबंध असल्याचा दाट संशय पतीला होता. याच रागातून पतीने हे कृत्य केल्याचे समोर आलेय. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री घडली असून या घटनेत जीम मालक गंभीर जखमी झाला आहे.

रितेश कदम असे जखमी झालेल्या जीम मालकाचे नाव आहे. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रितेश कदम यांची विरारच्या फुलपाडा परिसरात स्विट बॉक्स फिटनेस नावाची जिम आहे. याच जीममध्ये आरोपीची पत्नी व्यायाम करण्यासाठी जात होती. आपल्या पत्नीसोबत जीम मालक रितेश याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला आला होता. यामुळे त्याने रितेश कदम याच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन आरोपीने मित्रासोबत बुधवारी रात्री रितेश कदम याची ज्या ठिकाणी जीम आहे तिथे गेला. जिमच्या समोर असलेल्या गल्लीमध्ये उभा राहून रितेशची वाट पाहिली. रितेश येताच आरोपीने त्याच्यावर अ‍ॅसिड हल्ला (Acid attack) करुन फरार झाला आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रितेशवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Related Posts