IMPIMP

धक्कादायक ! पत्नीचा निर्घृण खून करून पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या

by sikandershaikh
former chhattisgarh minister rajinder pal singh bhatia found hanging at home suicide suspected

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याची मागणी करणा-या पत्नीचा निर्घृण खून करून पतीने गळफास (suicide) घेतल्याची धक्कादायक घटना ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात उघडकीस आली आहे. बुधवारी (दि. 17) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी पतीविरोधात पत्नीचा खून आणि स्वत: आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला केला आहे.

अश्विनी आकाश समुखराव (वय 18) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आकाश समुखराव (29, रा. वागळे इस्टेट, ठाणे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

श्रीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि अश्विनी यांचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता.
अश्विनीने घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे वेगळे राहण्याचा तगादा आकाशकडे लावला होता. यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती.
सध्या ते इंदिरानगर येथील घरात एकत्र कुटुंब पद्धतीने वास्तव्य करीत होते.
मात्र, रात्री झोपण्यासाठी ते जवळच असलेल्या रूपादेवी पाडा क्रमांक 2 येथील नातेवाइकाच्या घरी जात होते.
16 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता ते या ठिकाणी झोपण्यासाठी आले होते. मात्र तिथे पुन्हा त्यांचा याच मुद्द्यावरून वाद झाला.

दुसऱ्या दिवशी बुधवारी रोजी सकाळी 10 वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही.
त्यामुळे शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले.
त्यावेळी आकाश गळफास (suicide) घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला.
त्यावेळी या घराच्या छताचा पत्रा उचकटून स्थानिकांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याची पत्नी अश्विनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
जवळच लोखंडी हातोडाही होता. तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केल्याचे आढळले.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Mumbai News : होम क्वारंटाईन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का ! घराबाहेर पडल्यास दाखल होणार गुन्हा

Related Posts