IMPIMP

शिवसेना उपनेते, माजी आमदार, ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचं 66 व्या वर्षी निधन

by sikandershaikh
anant-tare

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) शिवसेना उपनेते, माजी आमदार ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे (anant tare) (66) आज (सोमवार) निधन झालं आहे. महिन्याभरापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या (मंगळवारी) दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

अनंत तरे (anant tare) यांनी 3 वेळा ठाण्याचे महापौरपद, धान परिषदेचे सदस्यपद भूषविले होते. महाराष्ट्र कोळी समाज संघ तसेच आई एकविरा देवस्थान ट्रस्टचे (कार्ला) ते अध्यक्ष होते. तरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. ठाण्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.

Related Posts