IMPIMP

महिला पोलिसाचे होते सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध, दोघांनी मिळून पतीचा असा काढला काटा

by nagesh
mudra

पालघर : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीचा सपासप वार करुन खून (mudra) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावात घडली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला पोलिसाचे तिच्याच पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. त्या दोघांच्या संबंधाची माहिती महिलेच्या पतीला समजल्यावर त्यांच्या वारंवार वाद होत होते. यामुळे महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुंडलिक आनंदा पाटील (वय-30 रा. पोलीस कॉलनी, रुम नं. 7) असे खून (mudra) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाटील यांच्या पत्नी स्नेहल पाटील वसई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मयत पुंडलिक पाटील हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. पाटील यांच्या पत्नीचे वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विकास पाश्टे याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. मयत पुंडलिक आणि आरोपी स्नेहल यांना तीन वर्षाची एक मुलगी आहे. तर स्नेहलचा प्रियकर विकास याचे देखील लग्न झाले आहे.

स्नेहल आणि विकास यांच्या अनैतिक संबंधाची माहिती पोलिस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांना होती. पुंडलिक अनेकवेळा स्नेहलला डबा देण्यासाठी यायचे त्यावेळी त्यांच्या कानावर विकास आणि पत्नी स्नेहलच्या संबंधाची माहिती मिळाली होती. यावरुन त्यांच्यात वारंवार वाद होत होते. त्यामुळे स्नेहलने पतीचा काटा काढण्याचा कट रचला. पतीचा खून करण्यासाठी स्नेहलने अडीच लाख रुपयांची सुपारी दिल्याचे चौकशीत समोर आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याशिवाय हा अपघात वाटेल असे दाखवण्यास सांगितले होते. त्यानुसार विकासने अविनाश भोईर, विशाल पाटील व स्वप्निल गोवारी यांना सुपारी दिली. त्यानुसार त्या तिघांनी रिक्षा भाड्याने घेतली.
पुंडलीक यांना मनोर जवळील ढेकाळे गावाबाहेर पुंडलीकला गाठले. त्यांनी पुंडलीकच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन खून केला.
पुंडलीकचे वजन जास्त असल्याने त्यांना मृतदेह दुसरीकडे नेता आला नाही.
त्यामुळे आरोपींनी पुंडलीकचा मृतदेह रिक्षात ठेवून रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात ढकलून अपघात असल्याचे भासवले. घटनेनंतर आरोपी पळून गेले.

पुंडलीक यांचा डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती.
या गुन्ह्यात मिळालेल्या विविध माहितीच्या अनुषंगाने या पथकांनी पाच जणांना विविध ठिकाणाहून अटक केली.
पथकाने वसई, विरार, ठाणे, कल्याण, पालघर या शहरात आरोपींचा शोध घेतला. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

‘मुख्यमंत्र्यांचे भाषण चौकात बोलल्यासारखे, त्यातच सैनिकांचा केला अपमान’; फडणवीसांचा आरोप

Related Posts