IMPIMP

Aadesh Bandekar On EVM Machines | आदेश बांदेकर संतापले, ”ईव्हीएम बंद पडल्याने लोक चार तासापासून रांगेत, ज्येष्ठ मतदार निघूल गेले, हे अत्यंत चुकीचे”

May 20, 2024

मुंबई : Aadesh Bandekar On EVM Machines | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. मुंबईत सर्वसामान्यांसह, उद्योगपती, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, राजकीय नेते, खेळाडू यांनी मुंबईत मतदान केले. दरम्यान, मतदान सुरू असताना सकाळीच पवईतील मतदान केंद्रावर (Powai Polling Station) तीन ते चार तास ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकरांनी संताप व्यक्त केला.

आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी आता पवई मतदान केंद्रावर आलो आहे. हा हिरानंदानीसारखा अतिशय सुशिक्षित विभाग आहे. याठिकाणी तुम्ही मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत याचा अंदाज घेऊ शकता.

ते पुढे म्हणतात, याठिकाणच्या ५७, ५८ या दोन्ही पोलिंग बूथवरील याद्या बंद झाल्या आहेत. तसेच ईव्हीएम मशिन्स देखील बंद आहेत. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल याठिकाणचा हा प्रकार आहे. सकाळपासून सगळ्या मशिन याठिकाणी बंद आहेत. आम्ही एवढा वेळ उभे आहोत पण, कोणीच उत्तर देत नाहीे.

सकाळपासून जे लोक आलेत ते सगळे ३-३ तास रांगेत उभे आहेत. वयस्कर लोक घरी निघून गेले आहेत. इथे कुठल्याच प्रकारची काहीच सोय नाही. हे अत्यंत चुकीचे आहे, अशी तीव्र नाराजी बांदेकर यांनी व्यक्त केली आहे.

इथे कोणी उत्तरच देत नाही. आम्हाला मतदान करायचंय पण, आता भरपूर वेळ झाला आहे. आता पुढे अजून किती तास लागतील याची काहीच कल्पना आम्हाला नाहीे, असे बांदेकर यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

Pune Crime News | पुणे : स्विगी कंपनीकडून हॉटेलची 56 लाखांची फसवणूक