IMPIMP

Ab De Villiers | विराट आणि ABD पुन्हा येणार ‘एकत्र’ !

by nagesh
Ab De Villiers | ipl 2022 ab de villiers may join rcb as batting consultant of hints head coach sanjay bangar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) याने काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएलमध्ये (IPL 2022) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) भाग होता. एबी डिव्हिलियर्सने (Ab De Villiers) अचानक निवृत्ती घेत त्याच्या चाहत्यांना धक्का दिला होता. यानंतर आता त्याच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिव्हिलियर्स हि जोडी पुन्हा आरसीबीमध्ये एकत्र दिसण्याची चिन्हं आहेत. आरसीबीचे हेड कोच संजय बांगरने याचे संकेत दिले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एबी डिव्हिलियर्ससारख्या (Ab De Villiers) खेळाडूनं बॅटींग कोच म्हणून काम केले तर ते खेळाडूंच्या फायद्याचे ठरेल. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे असे संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले आहेत. मात्र आरसीबीकडून याबाबतची अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. संजय बांगर यापूर्वी टीम इंडियाचे बॅटींग कोच होते. ते आता पुढील सिझनमध्ये आरसीबीचे हेड कोच म्हणून काम पाहणार आहेत. हेड कोचला बॅटींग आणि बॉलिंगसह टीमच्या एकूण प्लॅनिंगवर लक्ष द्यावं लागतं. त्याच्याकडे वेळ कमी असतो. बॅटींग कोच हा बॅटर्सना चुका दाखवण्याचे तसेच योग्य प्रशिक्षण देण्याचे काम करतो,’ असे बांगरने यावेळी स्पष्ट केले.

विराट आणि डिव्हिलियर्स 2011 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीममध्ये एकत्र खेळत आहेत.
या दोघांनी एकत्र अनेक दमदार पार्टनरशिप करून संघाला विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
मैदानात आणि मैदानाच्या बाहेरही दोघांमधील केमिस्ट्री प्रसिद्ध आहे.
विराट कोहलीने या सिझानपूर्वी आरसीबीची कॅप्टनसी सोडली आहे. तर आता डिव्हिलिर्यसनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
त्यामुळे आरसीबीमधील एका युगाचा शेवट झाला आहे.
एबी डिव्हिलियर्सने ज्यावेळी निवृत्ती घेतली तेव्हा विराट चांगलाच भावुक झाला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Ab De Villiers | ipl 2022 ab de villiers may join rcb as batting consultant of hints head coach sanjay bangar

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 1 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ स्टॉकने बदलले गुंतवणुकदारांचे नशीब, 1 लाख झाले रू. 65.06 लाख, तुमच्याकडे आहेत का?

Beed Crime News | पत्नीचं शेजार्‍याशी ‘झेंगाट’ असल्याचं पतीला समजलं, बायकोच्या अनैतिक संबंधास कंटाळून 37 वर्षीय नवर्‍यानं केलं ‘हे’ कृत्य

PIB Fact Check | मतदान केले नाही तर बँक अकाऊंटमधून कट होतील 350 रुपये? जाणून घ्या वायरल मेसेजचे पूर्ण ‘सत्य’

Related Posts