IMPIMP

Anil Deshmukh | ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नाव नाही?; सचिन वाझेसह 14 आरोपी

by nagesh
Anil Deshmukh Money Laundering Case | ed names anil deshmukh as main accused in the 7000 pages chargesheet filed in the money laundering case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Anil Deshmukh | मनी लॉड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ED) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये सचिन वाझेसह (Sachin Waze) १४ जणांविरोधात आरोप लावले आहे. मात्र या आरोपपत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांचा या आरोपपत्रात समावेश आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मुंबईतील बार मालकांकडून (Bar Owner in Mumbai) वसुली प्रकरणात शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही यामध्ये लागेबांधे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासंदर्भात ईडीने देशमुखांशी (Anil Deshmukh) संबंधित मालमत्तांवर छापेही टाकले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स ही बजावण्यात आले. मात्र देशमुखांनी प्रत्यक्ष चौकशीला उपस्थित राहण्यास नकार दिला. समन्स रद्द होण्यासाठी देशमुखांची न्यायालयीन लढाई सुरु आहे. दरम्यान ईडीने याप्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यामध्ये सचिन वाझे, देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्यासह १४ जणांवर आरोप लावण्यात आला आहे. मात्र अनिल देशमुख यांचे नाव आरोपपत्रात नसल्याचे समोर आले आहे. ईडीने देशमुख यांची चौकशी झाली नसल्याने त्यांचे नाव यामध्ये नसल्याचे सांगितले आहे.

देशमुखांच्या विरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यानंतर ईडीने चार ते पाच वेळा अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. मात्र ते उपस्थित राहिले नाही. त्यानंतर देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश यांनाही दोन वेळा समन्स बजावले होते. सुरुवातीला देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत. त्यामुळे ईडीने देशमुख यांच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.महत्त्वाचे म्हणजे अशातच ईडीने देशमुखांच्या शोधासाठी सीबीआयकडे मदत मागितली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Anil Deshmukh | ed told why name anil deshmukh not included chargesheet regarding money laundering case

हे देखील वाचा :

Mumbai Crime | वयोवृद्ध आईवडिलांची छळवणूक ! मुलाला 10 दिवसात अलिशान घर सोडण्याचे कोर्टाचे निर्देश

LIC Saral Pension Yojana | केवळ 1 वेळा प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळतील 12000 रुपये, LIC च्या ‘या’ प्लानमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या

Pune Crime | ‘चिकनगुनिया’वर औषध देतो म्हणून 29 वर्षीय तरूणीशी ‘लगट’, तरूणानं मित्राच्या घरी ‘लेप’चं ‘ट्रेनिंग’ देत केलं ‘काम’

Related Posts