IMPIMP

Anil Deshmukh | तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांना तुर्तास तरी घरचे जेवण नाहीच

by nagesh
Anil Deshmukh | former home minister anil deshmukh jail no home cooked meals right now

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटीच्या खंडणीच्या आरोपावरुन चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना अटक (Arrested) करण्यात आली. दरम्यान, देशमुख यांना सध्या विशेष पीएमएलए कोर्टाने (Special PMLA Court) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सोमवारी सुनावली आहे. यानंतर त्यांना बेड व औषधे पुरविण्याचे निर्देश दिले. मात्र, देशमुख यांना घरचे जेवण नसणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वय व त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. अशी विनंती देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम (Adv. Aniket Nikam) यांनी केली. त्यावर न्यायालयाने देशमुख यांना बेड व कारागृहातील डॉक्टरांना दाखवून औषधे नेण्याची परवानगी दिली. परंतु, घरचे जेवण देण्याबाबत केलेल्या अर्जावरील सुनावणी नंतर घेण्यात येणार आहे.

देशमुख यांना कारागृहातील जेवण घेतल्याने काही समस्या उद्भवली तर त्यांनी घरच्या जेवणासाठी तातडीने अर्ज करावा, असं कोर्टानं (Court) म्हटलं आहे.
यावरुन देशमुख यांना काही काळ कारागृहातील जेवण खावे लागणार आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर रोजी चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.
त्यानंतर देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
अखेरीस सोमवारी त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title: Anil Deshmukh | former home minister anil deshmukh jail no home cooked meals right now

हे देखील वाचा :

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

Nawab Malik | मलिकांचा आणखी एक ट्वीट ‘बाॅम्ब’ ! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स समोर, वानखेडेंवरही आरोप

Pune Crime | लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक ‘संबंध’

Related Posts