IMPIMP

Anil Parab | राजकीय संघर्षासाठी न्यायालयाचा वापर नको; उच्च न्यायालय अनिल परब यांचे म्हणणे ऐकणार

by nagesh
 Anil Parab | if you trouble poor marathi people i and shivsena will not remail silent anil parab challenge to kirit somaiya

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Parab | परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) न्या. संभाजी शिंदे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी व राजकीय संघर्षासाठी न्यायालयाचा वापर होऊ नये असे आम्हाला वाटते, असे मत न्यायालयाने व्यक्त करत सर्व प्रतिवादींचे आम्हाला म्हणणे ऐकावे लागेल. त्यांची सुनावणी घेतल्याविना कोणताही आदेश आम्ही देऊ शकत नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, ८ ऑक्टोंबरला या याचिकेवर प्रत्यक्ष सुनावणी न्यायालयात ठेवली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काही महिन्यांपूर्वी निलंबित आरटीओ गजेंद्र पाटील यांनी ॲड. व्ही. पी. राणे यांच्या मार्फत अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत असून त्यासंदर्भात सीबीआय
किंवा स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका
उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली.
या सर्व आरोपांविषयी नाशिक शहरच्या पोलीस आयुक्तांकडे याचिकाकर्ते गजेंद्र पाटीलयांनी तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर आरोपात तथ्य नसल्याचा अहवाल तयार करण्यात आला असून तो जाहीर करण्यात आला नाही.
तो अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना द्यावेत अशी विनंती पाटील यांच्यातर्फे ॲड. रणजीत सांगळे यांनी खंडपीठाला केली.
मात्र, सर्व प्रतिवादींचे म्हणणे ऐकल्याविना कोणताही आदेश देऊ शकत नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

यावेळी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नतीमध्ये विविध माध्यमातून पैशांची
देवाण-घेवाण होते.
या भ्रष्टाचारात परब नाही तर त्यांच्याबरोबर राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे
व अन्य पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Anil Parab | suspended cop moves hc seeks cbi probe against maharashtra minister anil parab

हे देखील वाचा :

Nanded Crime | नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थीनीचे रॅगिंग, वसतिगृह अधीक्षकांसह 3 विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

Raj Kundra Case | राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात पत्नी शिल्पा शेट्टी बनली साक्षीदार

Aurangabad Crime | औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून बेदम मारहाण

Related Posts