IMPIMP

काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीचं अंकाऊंट Hack, केली जातेय पैशाची मागणी

by sikandershaikh
Facebook

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) facebook | आजकाल सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. काही मोठ्या व्यक्तींची सोशल मीडियातील अंकाऊंट हॅक केली जात आहेत. तसेच त्या व्यक्तींच्या नावाने खोटी बनावट खाते बनवून पैशांची मागणी करण्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहे. असाच प्रकार जयश्री थोरात यांच्याबाबतीत घडला आहे. जयश्री थोरात या काँग्रेसचे नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत.

काय आहे नेमका प्रकार
एका अज्ञात व्यक्तीने जयश्री थोरात यांच्या नावाने एक फेसबुक अकाऊंट बनवले आहे. आणि त्या अकाऊंट वरून पैशाची मागणी करण्यात येत आहे. तसेच बाळासाहेब थोरात आणि जयश्री थोरात यांच्या फेसबुक (facebook) पेजवरील फोटोंचा गैरवापरसुद्धा केला जात आहे. या अकाऊंटवरून जयश्री थोरात यांच्या मित्र परिवाराकडून गुगल पे आणि फोन पे द्वारे पैशांची मागणी करण्यात येत आहे. याबाबतीत सिद्धार्थ बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमधील संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जयश्री थोरात या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरतज्ञ म्हणून काम करतात. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये जयश्री थोरात यांचा डॉ. हसमुख यांच्यासोबत साखरपुडा झाला आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.

Related Posts