IMPIMP

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

by Team Deccan Express
Chandrakant Patil | dont give the post of home minister to ncp this advice was already given to the chief minister says chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मागील काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना आज (बुधवार) पासून राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही संचारबंदी लागू करत असल्याचे सांगत त्यांनी सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

चंद्रकांत पाटील chandrakant patil म्हणाले, राज्यात 15 दिवांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करुन राज्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी एक पत्र ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेल केले, मात्र त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रतीकुटुंब केवळ 105 रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात प्रतीकुटुंब 105 रुपयांचा भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा दहा हजार रुपये कमवतात, मात्र त्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणा देखील अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलेल्या पत्रात म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील chandrakant patil पुढे म्हणाले, सर्व काळजी घेऊन शक्य ते उद्योगधंदे चालू ठेवण्यास परवानगी दिली. मात्र त्यांनी व्यापाऱ्यांविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. यामुळे याचा जबरदस्त फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. खरे त पुरेशी काळजी घेऊन व्यापाऱ्यांना काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. केवळ निर्बंध लादायचे आणि फारशी मदतही करायची नाही. या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे कुटुंबे उद्धवस्त होण्याची भीती चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी व्यक्त केली.

Read More : 

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts