IMPIMP

BJP Chandrakant Patil On Uddhav Thackeray Shivsena | ठाकरे- भाजपाचं मनोमिलन?; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने तर्कवितर्कांना उधाण

June 11, 2024

मुंबई: BJP Chandrakant Patil On Uddhav Thackeray Shivsena | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळालं आहे. महायुतीला त्या तुलनेत अत्यंत कमी जागा मिळाल्या. महायुतीला कमी जागा का मिळाल्या याचं विश्लेषण महायुतीचे नेते करत असतानाच महायुतीचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक झाल्याने त्याचं आत्मपरीक्षणही उद्धव ठाकरे यांनी करावं, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटील यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा आहेत.

पाटील म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना जास्त यश मिळालं असं वाटतंय. लोकसभेमध्ये सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. काही ना काही आजारपणं असतात, तशी त्यांचीही आजारपणं होती. पण ते खूप फिरले. त्यांना ९ सीट मिळाल्यात, २०१९ ला सरकार कंटिन्यू झालं असतं, युती कंटिन्यू झाली असती. त्यांच्या मात्र यंदा १३ आणि आठ सीट्स झाल्या. उद्धव ठाकरेंनी याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे.

उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी काय मिळवलं? हाताशी काय लागलं? एका बाजूला अल्पसंख्यांकांच्या मतांवर निवडून आलेले असा ठपका बसला. मनसेच्या एका नेत्यांनं ट्वीट केलं की, हा भगवा विजय नाही, तर हा हिरवा विजय आहे.