IMPIMP

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘मीच मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, कारण…’ (व्हिडीओ)

by nagesh
CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray criticized bjp leader devendra fadnavis statement about ncp leader nawab malik allegations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Uddhav Thackeray | शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळावा (dasara melava) मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये आज (शुक्रवारी) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संवाद साधला. त्यादरम्यान ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devedra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही. कारण मी मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे. ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो.
म्हणत त्यांनी भाषणाला प्रारंभ केला. मला कल्पना आहे, आपल्याला संधी मिळाली आहे.
आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही आणि आवाज दाबणारा कधी जन्माला येणार नाही,
असं उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. ‘आजचा हा क्षण आपल्यासाठी खूप मोलाचा आहे.
बाळासाहेबांनी ज्याची सुरुवात केली होती, तो तुमच्या साक्षीने आपण पुढे नेत आहोत.
शस्त्र पुजन केल्यानंतर मी तुमच्यावर फुलं उधळली, कारण तुम्ही माझे खरे शस्त्र आहात’ असं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही.
कारण मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे.
मी तुमचा भाऊ आहे, ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच.
कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे.

Web Title :- CM Uddhav Thackeray | shivsena dasara melava 2021 uddhav thackery on devendra fadanvis

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,898 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chandrakant Patil | शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; एकेरी भाषेत टीका करत म्हणाले… (व्हिडीओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 63 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts