IMPIMP

Crime News | मेहुण्याच्या प्रवेशासाठी डॉक्टरची तब्बल 4 लाख रुपयाची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Bharti Vidyapeeth Police Station - Fraud of crores with the lure of excess return on investment without an investment policy

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Crime News । जे.जे. रुग्णालयातील 43 वर्षीय भूलतज्ज्ञ डॉक्टरला (Doctor) चार लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेहुण्याला वैद्यकीय संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली येथील भूलतज्ज्ञ डॉक्टरची 4 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आलीय. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये (J. J. Marg Police Station) सोमवारी गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत अधिक माहिती अशी की, भूलतज्ज्ञ डॉक्टर हे जे.जे. रुग्णालयाच्या वसाहतीत राहतात. महामारीत जीटी हॉस्पिटलमध्ये काम करत असताना तेथे एका खासगी संस्थेच्या मनीष मारुती साळसकर (Manish Maruti Salaskar) (वय, 45) बरोबर ओळख झाली. तेव्हा त्या डॉक्टरांने बीड येथे राहणाऱ्या मेहुण्याच्या वैद्यकीय प्रवेशासाठी मनीष साळसकरकडे विचारणा केली. तेव्हा साळसकरने जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी तब्बल 4 लाख रुपयाची मागणी केलीय. चार लाख भरावे लागणार असे सांगितले. त्या डॉक्टरांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे भरले. यांनतर पुढं महाविद्यालयाची प्रवेशाची मुदत संपल्यानंतरही प्रवेश न मिळाल्याने त्यांना संशय आला. नंतर त्यांनी पैसे परत करण्यासाठी मागणी केलीय. तसेच त्यानं दिलेले चेकही वठले नाही. नंतर मनीष साळसकरने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. तसेच याबाबत त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे.

या दरम्यान, मनीष साळसकरने (Manish Salaskar) अनेक वेगळी आणि उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, याबाबत डॉक्टरना संशय आला. यावरून डॉक्टरना आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात (J. J. Marg Police Station) धाव घेतली. तक्रारीवरून पोलिसांनी साळसकर विरोधात गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Crime News | Fraud of Rs 4 lakh for admission of sister in law

हे देखील वाचा :

Aadhaar Card चे enrollment status ‘या’ पध्दतीनं तपासा, जाणून घ्या ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’, SEBI ने दिली परवानगी

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Related Posts