IMPIMP

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून; विरारमधील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | lover do wrong things in girl house of hadapsar police station area

विरार (Virar): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Crime News | विरार पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीत सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवजात बालिकेला इमारतीवरून खाली फेकून दिल्याचे समोर आले आहे. सोसायटीतील अन्य रहिवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्वरित बालिकेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात (arnala police station) गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम यशवंत नगर परिसर शिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीचा परिसर आहे. या परिसरातील ट्युलिप सोसायटीत सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आतील मोकळ्या जागेत स्थानिक रहिवाशांना एक नवजात बाळ आढळून आलं होतं. इमारतीवरून कोणीतरी हे बाळ फेकल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. बाळाला अनेक ठिकाणी दुखापत झाली होती. त्याला कपड्यात गुंडाळून स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसेच अर्नाळा पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान स्थनिकांनी दिलेल्या माहितीनुसार या बाळाला या सोसायटीत कधीही पहिले गेले नाही. तसेच कोणत्या मजल्यावरून फेकले गेले आहे याचीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे बाळ कोणाचे आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. उपचारादरम्यान, काही वेळात या बाळाचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Web Title : crime news threw a newborn baby from a highbrow society building in virar

हे देखील वाचा :

Pakistan | ‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देण्याची केली घोषणा

Tokyo Olympics 2020 | नीरज चोपडा याने पहिल्याच ‘भालाफेकी’त रचला ‘इतिहास’ फायनलमध्ये मिळविले स्थान

PM Kisan | खुशखबर! 12.11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत 2000 रुपये, चेक करा कधी येणार पैसे?

Related Posts