IMPIMP

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; दिल्लीतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

June 6, 2024

मुंबई: Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Election Results 2024) अगदी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याचे वक्तव्य केले आहे.

तर दुसरीकडे दिल्लीत सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात भाजपाच्या (BJP Leader) दिग्गज नेत्यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाला राज्यात म्हणावे असे यश खेचून आणता आले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा संकेत दिला .

यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाली. या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा मागे घेऊ नये, यासाठी विनंती केली जात आहे. सर्व नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम आहेत. याबाबत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

” भाजपाला विधानसभा निवडणुकीत ताकद द्यायची असेल तर माझं बाहेर राहून काम करणं अधिक महत्वाचे आहे. मी पक्षात राहून काम केलं तर सरकार आणि पक्ष या दोन्हीवर होणाऱ्या टीकेला उत्तरे देता येतील. शिवाय पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मला वेळ मिळेल, मंत्रिपद महत्वाचे नाही पक्ष अधिक महत्वाचा आहे.”

दिल्लीत जाऊन फडणवीस वरिष्ठांसमोर काय भूमिका मांडतात ? आणि वरिष्ठ यावर काय निर्णय घेतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.