IMPIMP

Devendra Fadnavis | ओबीसी-मराठा वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका ; भुजबळांबद्दल म्हणाले …

by sachinsitapure

मुंबई: Devendra Fadnavis | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation Andolan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) उपोषणाला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दरम्यान राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा (OBC Vs Maratha) असा संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही मी अंतरवाली सराटी इथंच ओबीसी आरक्षण बचावासाठी (OBC Reservation) प्राणांतिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.

“ओबीसींचं सामाजिक न्यायाचं आरक्षण वाचवण्यासाठी मी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी इथंच मी उपोषण करणार असून याबाबत माझी अंतरावाली गावातील आणि आसपासच्या भागातील नागरिकांशी चर्चा झाली आहे,” अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. ज्या गावात मनोज जरांगे उपोषण करत आहेत, त्याच गावात हाके यांनीही उपोषणाची भूमिका घेतल्यास दोन समाजात संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागणार आहे. सरकारने काढलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, तसेच मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा मागण्या जरांगे पाटलांकडून केल्या जात आहेत. या दोन्ही समाजाच्या भूमिकेमुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.”आम्ही ओबीसी नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेली अधिसूचना ही कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातील नाही, हे आम्ही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि इतर ओबीसी नेत्यांना समजावून सांगणार आहोत,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

तसंच “मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरही कार्यवाही केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून वेगाने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनीही आपले उपोषण स्थगित करायला हवे”,अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

Related Posts