IMPIMP

Global Air Quality Index | मुंबई जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; जाणून घ्या टॉप 6 शहरांची नावे

by nagesh
global air quality index mumbai is the 7th most polluted city in the world listed in the global air quality index

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Global Air Quality Index | दिवाळीतील रासायनिक फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील प्रदूषणात (Mumbai Pollution) मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील प्रदूषण चिंताजनक स्तरावर पोहचले आहे. जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (Global air quality index) शुक्रवारी (दि.5) मुंबई जगातील 7 वे प्रदूषित शहर ठरले आहे. लक्ष्मी पुजनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 169 नोंदवला गेला आहे. त्यानुसार मुंबई शहर (Mumbai City) हे जगातील 7 व्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे.

पहिल्या क्रमांकावर 426 हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार दिल्ली शहर (Delhi City) आहे. दिल्ली शहर सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. कोलकाता (Kolkata) शहराचा देखील प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश आहे. गुरुवारी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक हा मध्यम म्हणजे 162 नोंदवला गेला. तर कुलाबा 290 आणि बीकेसी 290 हवेचा स्तर वाईट नोंदवला गेला होता. नवी मुंबई हवा गुणवत्ता निर्देशांक 118, अंधेरी 135, बोरिवली 142, चेंबूर 162 सह मध्यम तर वरळी येथे हाच निर्देशांक 95 सह समाधान कारक नोंदवला गेला. मात्र मुंबईत शनिवारी पुन्हा एकदा प्रदूषणाची पातळी वाढली आहे.

जागतिक हवा गुणवत्ता निर्देशांक (5 नोव्हेंबर)

मुख्य शहर देश एक्यूआय (AQI)

  • दिल्ली भारत 426
  • लाहोर पाकिस्तान 246
  • बीजिंग चायना 212
  • बुशकेक कर्गिस्तान 188
  • कराची पाकिस्तान 182
  • शिन्यांग चायना 171
  • मुंबई भारत 169

Web Title : global air quality index mumbai is the 7th most polluted city in the world listed in the global air quality index

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Aryan Khan Drugs Case | ‘सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, तोच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड’ – भाजपचे मोहित कंबोज

Lunar Eclipse 2021 | काही दिवसातच होणार शतकातील ‘दिर्घ’ चंद्रग्रहण, भारतातील ‘या’ भागातून दिसणार

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात ‘पीएम केअर फंडा’मधील व्हेंटिलेटरमुळे आग भडकली? आमदार रोहित पवारांना संशय

Diwali Shopping | गेल्या 10 वर्षातील सर्व रेकॉर्डब्रेक ! दिवाळीला 1.25 लाख कोटीच्या वस्तूंची विक्री; चीनचे 50 हजार कोटीपेक्षा जास्त नुकसान

Related Posts