Husband Kill Wife In Mumbai | दुसऱ्या पुरुषासोबत फिरणं खटकल्याने पत्नीचा केला खून, आरोपी पती अटकेत

मुंबई: Husband Kill Wife In Mumbai | दुसऱ्या पुरुषासोबत फिरणं खटकल्याने पतीने पत्नीचा खून केल्याची घटना मालाड परिसरातून समोर आली आहे. याबाबत नितीन धोंडीराम जांभळे (वय-३२) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन आणि कोमल (वय-२५) यांनी ६ वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. कासमबाग याठिकाणी दोघे राहायचे. त्यांच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. तसेच कौटुंबिक नाराजी आणि पैशावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. लग्नानंतर कोमल बाहेरगावी जायची. ती दुसऱ्या एका तरुणासोबत फिरू लागली. त्यांचा एक खासगी फोटो पती नितीनने व्हायरल केला होता. याबद्दल कोमलने पतीविरुद्ध गुन्हाही नोंदवला होता.
नितीन हा अनेकदा आपल्या पत्नीला आपल्यासोबत राहण्यासाठी बोलवत असे. मात्र ती त्याच्याकडे अधिक पैशांची मागणी करत होती. काल संध्याकाळी (दि.३०) नितीनने कोमलला भेटण्यासाठी मित्राच्या घरी बोलवले. कोमल त्याला भेटायला गेली असता, तिने त्याच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. या वादातून आरोपीने कोमलच्या मानेवर, पाठीवर आणि गळ्यावर चाकूने वार केले. खून केल्यानंतर त्याने पत्नीला बाथरुममध्ये बंद केले आणि तिथून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हा बँकेत काम करायचा. तर कोमल ही खासगी नोकरी करत होती. कोमलचे वडील हे मालाड पूर्व याठिकाणी राहतात. आरोपी नितीन त्याच्या पत्नीवर संशय घ्यायचा. ती दुसऱ्या व्यक्तीसोबत फिरते याचा त्याला प्रचंड राग होता. नितीन जेव्हा तिला फोन करायचा तेव्हा ती त्याच्याकडे पैसे मागायची. त्यामुळे तो रागवायचा. काल रात्री त्याने तिला त्याच्या मित्राच्या घरी बोलावून तिची हत्या केली. दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments are closed.