IMPIMP

IPL Record | पंजाब आणि बंगळुरूच्या सामन्यात रचला गेला विचित्र विक्रम; इतिहासातही झाला नव्हता असा विक्रम

by nagesh
IPL Record | ipl 2022 pbks vs rcb match made weird record that has never happened before in the 15 year history of ipl virat kohli faf du plessis odean smith

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन IPL Record | आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या पर्वाला सुरूवात झाली आहे. आयपीएलमध्ये अनेक विक्रम रचले गेले आहेत मात्र रविवारी पार पडलेल्या पंजाब आणि बंगळुरूच्या (PBKS vs RCB) सामन्यात एक विचित्र विक्रमाची नोंद झाली आहे. या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाने विजय मिळवला होता. (IPL Record)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नाणेफेक जिंकत बंगळुरूचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने (Faf du Plessis) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हा निर्णय सार्थ ठरवत बंगळुरूने 20 षटकात 205 धावा केल्या. यामध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी 23 अतिरिक्त धावा दिल्या.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाच्या फलंदाजांनीही बंगळुरूला धु – धु धुतलं आणि सामना जिंकवला.
त्यासोबतच बंगळुरूच्या गोलंदाजांनी 22 अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे एका सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 45 धावा दिल्या. (IPL Record)

आयपीएलच्या आतापर्यंतच्या एकाही सीझनमध्ये कोणत्याही सामन्यात 45 अतिरिक्त धावा गेल्या नव्हत्या.
त्यामुळे अनपेक्षितपणे हा विक्रम रचला गेला आहे.
सामन्यावर नजर टाकली तर, कर्णधार फाफने फलंदाजीला येत अक्षरक्ष: गोलंदाजांवर बरसला.
त्यानंतर फिनिशिंगच्यावेळी दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आक्रमक खेळी केली आणि संघाला 200 धावांच्या पार नेलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, पंजाब संघाला 206 धावा करायच्या असल्यामुळे मोठा दबाव होता. मात्र कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), शिखर धवन (Shikhar Dhawan), राजपक्षे यांनी आक्रमक खेळी करत विजयाचा पाया रचला.
त्यानंतर शेवटच्या 5 षटकात 50 धावांची गरज असताना शाहरूख खान आणि ओडिअन स्मिथ (Odean Smith)
यांनी अनुक्रमे 24 आणि 25 धावा केल्या आणि पंजाबच्या विजयाचा नारळ फोडला.

Web Title :- IPL Record | ipl 2022 pbks vs rcb match made weird record that has never happened before in the 15 year history of ipl virat kohli faf du plessis odean smith

हे देखील वाचा :

Dr. Rajendra Singh In Pune | … तोपर्यंत नदी पुनरुज्जीवन यशस्वी होऊ शकणार नाही – डॉ. राजेंद्र सिंह

Kangana Ranaut-Ananya Panday Ramp Walk | कंगना रनौत समोर फिकी पडली अनन्या पांडे, ‘क्वीन’नं मारली बाजी (Photos)

Diabetes Symptoms | अखेर डायबिटीजमध्ये पायांमध्ये का होतात वेदना? ‘या’ 3 टिप्समुळे मिळेल आराम; जाणून घ्या

Related Posts