Jayant Patil On Mahayuti | रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला; म्हणाले, ” काही असंतुष्ट आत्मे…”
मुंबई: Jayant Patil On Mahayuti | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु झालेली आहे. ही निवडणूक दोन-तीन महिन्यांवरती येऊन ठेपली आहे. दरम्यान महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे दावे केले जात आहेत. मागेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यामध्ये दोन महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार कशाला ? असा सुरु निघाल्याचीही चर्चा आहे.
त्यानंतर शिंदे गटाकडून याबाबत प्रतिक्रिया समोर आली. “मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, अशी बातमी हायकमांडच्या माध्यमातून आली की कोणत्या माध्यमातून आली हे माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला पाहिजे. अन्यथा आमदार नाराज होतील. पण मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे? मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं होणार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार हा होईल”, असं संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी बुधवारी म्हटलं होतं.
या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही भाष्य करत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. “मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.
ते म्हणाले, ” मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, ही शेवटची संधी आहे. त्यामुळे बरेच आमदार मागे लागले आहेत की मंत्रिपदाचं स्वप्नं किमान दोन महिन्यांसाठी तरी पूर्ण करा. त्यामुळे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा महायुती सरकारचा शेवटचा प्रयत्न आहे. कारण परत महायुतीचे सरकार येईल याची खात्री नाही. त्यामुळं जर पुन्हा सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोड्या दिवसांसाठी तरी मंत्री करा, असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे, असे म्हणत शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) नेते जयंत पाटील यांनी महायुतीला खोचक टोला लगावला आहे.
Comments are closed.