IMPIMP

Maharashtra BJP Core Committe Meeting | भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यरात्री मोठी खलबतं, माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | other party leaders will come to bjp by 2024 say chandrashekhar bawankule
June 22, 2024

मुंबई : Maharashtra BJP Core Committe Meeting | लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठा अपयशानंतर पुन्हा एकदा भाजपा नेते विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात भाजपाची पिछेहाट झाल्याने केंद्रातील नेत्यांनीही गंभीर देखील घेतली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी आणि लोकसभेच्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी भाजपा कोअर कमिटीची काल रात्री बैठक झाली, आठ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकारांना माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण या बैठकीत करण्यात आले. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अपप्रचार करून मते मिळविली. भाजपा संविधान बदलणार, असा खोटा प्रचार केला.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, मविआच्या या नेत्यांनी आदिवासी समाजाला सांगितले की, तुमचे हक्क हिसकावले जाणार आहेत. महिलांना सांगितले की, प्रत्येक महिना खटाखट साडेआठ हजार रुपये देणार आहोत. असा खोटा प्रचार केल्यामुळे भाजपाला फटका बसला.

कोअर कमिटीच्या बैठकीबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील चुकांची पुनरावृत्ती टाळणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासंदर्भात चर्चा झाली. यासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करतील. आगामी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी कोण उमेदवार असतील, यावरही बैठकीत चर्चा झाली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असेल तर जनतेचा फायदा होतो. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्राच्या योजना थांबतील. तसेच आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे बावनकुळे म्हणाले.