IMPIMP

Maharashtra Cabinet Expansion | राज्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

by sachinsitapure

मुंबई: Maharashtra Cabinet Expansion | यंदा राज्यात भाजपाला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) म्हणावे असे यश मिळाले नाही. त्यामुळे फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आणि त्यानंतर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देणार असल्याचे वक्तव्य केले होते. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला २७ जूनपासून सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी माहिती मिळत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीत नेत्यांसह कार्यकर्तेही निराश आहेत. त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय का? अशीही चर्चा आहे.

दिल्लीत रविवारी एनडीए सरकारच्या (NDA Govt) मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, यामध्ये शिंदे गटाला केवळ एक राज्यमंत्रीपद तर अजितदादा गटाला (Ajit Pawar NCP) एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्याची भरपाई आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात केली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपकडून (BJP) तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय,गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील. जेणेकरुन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या घटकपक्षांमधील नेत्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. दरम्यान आता २९ मंत्री आहेत त्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह ४३ इतकी होऊ शकते. त्यामुळे आता राज्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Posts