IMPIMP

Maharashtra Mantralaya | मंत्रालयातील तळीरामांना शोधण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Mantralaya | मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण (Maharashtra Mantralaya) झाले आहे मंगळवारी मंत्रालयातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडला आहे. या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा, याच्या चौकशीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेचा निषेध केला असून ही महाराष्ट्राच्या गौरवाला काळीमा फासणारी घटना असल्याची टीका केली. तसेच १५ दिवसांत याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मंत्रालयात अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र तरीही उपहारगृहाच्या बाजूला तळमजल्याच्या आसपास अडगळीत दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला. त्या बाटल्या हटवण्यात आल्या आहेत. आता मंत्रालयातील या तळीरामांचा शोध घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या घटनेसंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी
पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या
अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, या बाटल्या येथे कशा आल्या, तसेच यामध्ये दोषी कोण आहेत, या संबंध प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title : Maharashtra Mantralaya | how did the bottles of liquor come to the mantralay government set inquiry panel

हे देखील वाचा :

Indian Railways | IRCTC ने ऑनलाइन ट्रेन तिकिट बुकिंगचे ‘हे’ नियम बदलले, करावे लागेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | बजाज कंपनीच्या बनावट अकाउंटद्वारे फसवणूक

Pune News | क्रिकेटच्या क्लासला जात असलेल्या 18 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, 11 वर्षीय भाऊ गंभीर जखमी; गॅरेज चालकाला अटक

Gold Price Today | खुशखबर ! सोने 11,000 रूपयांनी झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी ‘घसरण’; जाणून घ्या नवीन दर

Related Posts