IMPIMP

Maharashtra Rains | राज्यात ‘धो-धो’ पाऊस ! मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’

by nagesh
Rain in Maharashtra | weather udpate cyclonic status in bay of bengal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rains | गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानाचं पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसला आहे. यामुळे आता राज्यात (Maharashtra Rains) आगामी 48 तासात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे. दरम्यान आज (मंगळवारी) फक्त 8 जिल्हे सोडून राज्यात सर्वदूर जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यात उद्या (बुधवारी) कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आज (मंगळवारी) कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे 8 जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. आगामी काही तासामध्ये याठिकाणी वेगवान वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain) शक्यता भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे. त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे.
तसेच बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झालीय.
पण येत्या काळात बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती मंदावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. या दरम्यान, उद्या जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे 7 जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.

Web Title :- Maharashtra Rains | for next 2 days heavy rainfall possibilities in maharashtra

हे देखील वाचा :

Mayor Muralidhar Mohol | पुणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘पुण्यदशम’ने प्रवासादरम्यान ‘आधारकार्ड’ची सक्ती रद्द !

Sanjay Raut | ‘त्या’वेळी चंद्रकांत पाटील यांनाही तोंडाला फेस आला होता – संजय राऊत

Nitesh Rane | शिवसेना-राणे पुन्हा आमनेसामने; ‘त्या’ 2 प्रकल्पावरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर ‘प्रहार’

Related Posts