Mahavikas Aghadi On Maratha-OBC Reservation | आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा ‘मविआ’चा निर्णय; जाणून घ्या

मुंबई: Mahavikas Aghadi On Maratha-OBC Reservation | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण या बैठकीत विरोधकांनी बहिष्कार घातल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.
विधानपरिषदेतही अनिल परब (Anil Parab) यांनी आधीच्या बैठकांना बोलावले नाही या बैठकीत काय तोडगा काढणार? असे म्हंटले. राज्यसरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्याने महाविकास आघाडी बैठकीला न जाता, राज्यशासनाने आरक्षणप्रश्नी भूमिका सभागृहात स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.
राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरु असताना आंदोलकांसोबत केलेली चर्चा, दिलेले आश्वासन शासनाने सभागृहात मांडावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काय चर्चा केली होती ती राज्यातल्या जनतेला कळली पाहिजे. आरक्षण प्रश्नी सरकारने दोन्ही समाजाचे समाधान व्हावे असा तोडगा काढावा, सरकारने न्याय देण्याची भूमिका घ्यावी असे महाविकास आघाडीने म्हंटले आहे.
Comments are closed.