Mehul Choksi Arrested | पीएनबी बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक; भारतात आणण्यासाठी हालचाली

मुंबई : Mehul Choksi Arrested | पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) (Punjab National Bank) कर्ज घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) अपीलवरून चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली. तो अजूनही तुरुंगात असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून १३ हजार ५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता. येथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्प मध्ये राहत होता. मात्र, आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबासह देशातून पसार झाले होते. तपास यंत्रणेने २०१८ च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले. अशातच आता चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला असल्याची माहिती आहे.
अहवालात म्हटले आहे की, हे वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते. त्याचबरोबर पुढे असे म्हटले जात आहे की, मेहुल चोक्सी प्रकृती बिघडली असल्याने आणि इतर कारणांमुळे जामीनसह तात्काळ सुटकाही मागू शकणार असल्याची शक्यता आहे.
Comments are closed.