IMPIMP

MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

by nagesh
MPSC | mpsc exam mumbai hc stays 111 mpsc appointments no appointment to general category from ews maratha kranti morcha protest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) परीक्षेअंती निवड झालेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तसेच या आदेशानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते आक्रमक झाले. उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळावीत, यासाठी आयोगाच्या (MPSC) विरोधात आंदोलन करण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सर्व 111 उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार होती.
पण, ऐनवेळी खटला दाखल झाला आणि उमेदवारांची निराशा झाली. उच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्याने सर्व कारभार गोंधळला आणि उमेदवार आंदोलनावर उतरले.
मराठा समाजावर अन्याय केला जात आहे. 111 उमेदवारांना ताबडतोब नियुक्त पत्रे द्या,
असे यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील म्हणाले. आबासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे यासंबंधित तातडीची सुनावणी झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्या होत्या.
त्यापैकी 111 नियुक्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या मराठा उमेदवारांना ईडबल्यूएस
(आर्थिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातून आता नियुक्ती पत्र देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- MPSC | mpsc exam mumbai hc stays 111 mpsc appointments no appointment to general category from ews maratha kranti morcha protest

हे देखील वाचा :

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR
Kolhapur Crime | कोल्हापुरात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या गावगुंडांना खाकी वर्दीचा दणका

Pune Traffic Police – PMC Water Supply | ‘जड वाहतूक’ या शिर्षकाखाली वाहतूक पोलिसांची ‘पाण्याच्या टँकर्स’वर कारवाई ! पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने उपनगरातील नागरिकांकडून संताप व्यक्त

Related Posts