IMPIMP

Mumbai Chembur Accident | रस्ता ओलांडताना भरधाव टँकरची धडक; चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू, परिसरात हळहळ

by nagesh
Mumbai Chembur Accident | two brothers kill in accident Chembur News

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Chembur Accident | रस्ता ओलांडण्यासाठी उभे असताना भरधाव टॅंकरच्या धडकेत दोन चुलत भावंडाचा मृत्यू (Died) झाल्याची घटना (Mumbai Chembur Accident) घडली. या अपघातात सृष्टी मुकेश गुप्ता (Shrishti Mukesh Gupta) (वय 2 वर्ष) आणि ऋषी रमेशकुमार गुप्ता (Rushi Ramesh Kumar Gupta) (वय, 3 वर्ष) या चुलत बहिण भावाचा (Cousin) मृत्यू झाला आहे, तसेच, या अपघातात आईच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना मंगळवारी चेंबूर (Chembur) परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत अधिक माहिती अशी की, रंजना मुकेश गुप्ता (Ranjana Mukesh Gupta) (रा. कल्याण) चेंबूर परिसरात राहणाऱ्या आईकडे मुलगी सृष्टीसोबत राहण्यास आल्या होत्या. तर, 21 जून रोजी मुलगी सृष्टी आणि भावाचा मुलगा ऋषीला बरे वाटत नसल्याने दोघांना डॉक्टरला दाखवण्यासाठी घराबाहेर पडल्या. सव्वा अकराच्या सुमारास चेंबूर नाक्याच्या दिशेने रस्ता ओलांडण्यासाठी उभे असताना भरधाव वेगाने आलेल्या टँकरने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी (Serious injuries) झाले. (Mumbai Chembur Accident)

दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने त्यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोघा भावडांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे गुप्ता कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी स्थानिकांनी टँकर चालक राजेंद्र पुरोहितला (Driver Rajendra Purohit) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी (Tilak Nagar Police) चालकाविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title :- Mumbai Chembur Accident | two brothers kill in accident Chembur News

हे देखील वाचा :

Jayant Patil | राज्यात राजकीय संकट! जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य; म्हणाले…

Currency Printing Rate List | RTI मध्ये खुलासा, 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटांच्या छपाईचा रेट

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचं आणखी एक ट्विट जारी; म्हणाले – ‘ही आहे शिवसेना आमदारांची भावना’

Related Posts