IMPIMP

Mumbai Crime | मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; प्रचंड खळबळ

by nagesh
Mumbai Crime | mumbai woman allegedly sexually harassed in bjp corporator office by party worker fir registered in borivali police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Crime | मुंबईत दिवसेंदिवस हादरवून सोडणाऱ्या घटना (Mumbai Crime) घडताना दिसत आहेत. नुकतंच साकीनाका बलात्कार प्रकरणाची (Sakinaka rape case) घटना घडल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क मुंबईतील भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयातच (BJP corporator office) एका महिलेवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांत (Borivali Police) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत माहिती अशी, मुंबईतील (Mumbai Crime) बोरिवली परिसरातील एका भाजपच्या नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेवर भाजप कार्यकर्त्याने बलात्काराचा (Rape) प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर तक्रार दाखल करुन देखील पोलिसांनी महिनाभर दखल घेतली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, अखेर आता बोरिवली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

दरम्यान, पीडित महिला एक समाजसेविका आहे.
ही महिला भाजपच्या कार्यालयात काही कामासाठी गेली होती त्यावेळी आरोपीसोबत तिची ओळख झाली.
त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पीडित महिला भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात गेली असता
आरोपीने कार्यालय बंद करुन पीडित महिलेचा विनयभंग करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केलाअसल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नगरसेविकेच्याच कार्यालयात हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title :- Mumbai Crime | mumbai woman allegedly sexually harassed in bjp corporator office by party worker fir registered in borivali police

हे देखील वाचा :

OBC Reservation | OBC चा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; अखेर सुधारीत अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

LPG Cylinder Subsidy | स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत सरकारचा नवीन प्लान, जाणून घ्या आता कुणाच्या खात्यात येणार पैसे?

Pegasus | पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी SC स्थापन करणार तज्ज्ञांची समिती

Related Posts