IMPIMP

Mumbai Crime | वयोवृद्ध आईवडिलांची छळवणूक ! मुलाला 10 दिवसात अलिशान घर सोडण्याचे कोर्टाचे निर्देश

by nagesh
Pune ATS | no evidence of terror link pune court gives bail to two who arrested by ats for allegedly recruiting for lashkar e taiba pune crime news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mumbai Crime | मुंबईत मुलाकडून जन्मदात्या वयोवृद्ध आई-वडिलांची छळवणूक (Mumbai Crime) केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, न्यायालयाने (court) याप्रकरणी एक मोठा महत्वाचा निर्वाळा केला आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने आदेश देत संबंधित आरोपी मुलाला 10 दिवसांच्या आत आई-वडिलांचं आलिशान घर (Luxurious home) सोडण्याचे निर्देश दिले आहेत. हे कुंटुंब मुंबईच्या जुहू परिसरात वास्तव्यास आहे. मुलगा, सुनेच्या छळवणुकीतून वृद्ध दाम्पत्याची सुटका न्यायालयानं केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत माहिती अशी, आशिष दलाल (Ashish Dalal) असं संबंधित मुलाचं नाव आहे.
जुहू परिसरात एका अलिशान बंगल्यात मुलगा, पत्नी, आई-वडिल वास्तव्यास आहेत.
हे आई-वडिल साधारण 90 वयाच्या घरातले आहेत.
त्यांची मुलाने आणि सुनेनं छळवणूक (Harassment) करुन त्रास देत होते.
या प्रकरणामुळे त्या वृद्ध आई-वडिलाने देखभाल लवादाकडे याबाबत तक्रार दिली.
आपल्या होणा-या अत्याचाराची माहिती दिली होती.
त्यांच्या या माहितीवरुन संबंधित लवादाने मुलाला, सुनेला आई वडिलांचं घर सोडण्याचे निर्देश दिले होते.

आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायद्याअंतर्गत लवादानं हा आदेश दिला होता.
दरम्यान, गतवर्षी ऑक्टोबरमध्ये लवादानं हा निर्णय दिल्यानंतर मुलगा आशिष दलालने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.
मात्र, न्या. गिरीश कुलकर्णी यांनी लवादाचा निर्णय योग्य ठरत याचिकाकर्त्याला (मुलगा आणि सुन) आई-वडिलांचं घर सोडण्याचे निर्देश कोर्टाने (court) दिले आहेत.
त्याचबरोबर 10 दिवसाच्या आत घर सोडण्याचं देखील सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘आपल्यासमोर हताश आईवडिलांची दु:खद कहाणी आहे.
त्यांना आयुष्याचा हा काळ शांततेत आणि आनंदात जगायचा आहे. त्यांच्या कमीत-कमी गरजा आहेत.
पण श्रीमंत मुलामुळे त्यांना त्यांच्या अपेक्षा आणि गरजांपासून वंचित राहावं लागत आहे.
वृद्ध आणि गरजू पालकांची काळजी घेण्याऐवजी त्यांचा छळ केला जात आहे.
याचिकाकर्ता आपल्या कर्तव्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
या वयात मुलानं आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडलं आहे.
‘ असं सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटलं आहे.

Web Title : Mumbai Crime | son and daughter in law harassed elderly couple court order to leave parents luxurious house in 10 days mumbai

हे देखील वाचा :

LIC Saral Pension Yojana | केवळ 1 वेळा प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळतील 12000 रुपये, LIC च्या ‘या’ प्लानमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या

Pune Crime | ‘चिकनगुनिया’वर औषध देतो म्हणून 29 वर्षीय तरूणीशी ‘लगट’, तरूणानं मित्राच्या घरी ‘लेप’चं ‘ट्रेनिंग’ देत केलं ‘काम’

Pune Crime | प्रेमसंबंधातून दोन वर्षापुर्वी जन्मलं ‘बाळ’, 25 वर्षीय तरूणीने प्रियकरानं ‘बरेवाईट’ केल्याचं मुंढवा पोलिसांना सांगितलं

Related Posts