IMPIMP

Ghatkopar Car Video | मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

by omkar
Ghatkopar Car Video

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Ghatkopar Car Video | जोरदार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी भरले होते. अनेक भागात ट्रॅफिक जाम होते तर, कुठे लोकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले होते. याच कठिण काळातील घाटकोपर परिसरातील एका व्हिडिओने अनेकांना हैराण केले आहे. (ghatkopar car video) व्हिडिओमध्ये एक गाडी बघता-बघता जमीनीवरील सिंकहोलमध्ये गेली होती. हा व्हिडिओ सर्वत्र वायरल झाला होता. यानंतर तिच गाडी मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आली.

Petrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील 1 लीटरचे दर

जमीनीत गेलेल्या कारचे रेस्क्यू
स्थानिक प्रशासनाने अगोदर दोन वॉटर पम्पद्वारे विहिरीतील पाणी बाहेर काढले आणि त्यानंतर एका मोठ्या क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढली.
ती गाडी 12 तास विहिरीतील पाण्यात बुडालेली होती आणि रात्री प्रशसनाचे रेस्क्यू पूर्ण झाले.
ही गाडी काढणे अवघड होते, ते यावरूनच समजू शकते की,
एका अधिकार्‍याला प्रत्यक्ष विहिरीत उडी मारून अगोदर गाडीला रश्शीने बांधावे लागले होते, तेव्हा क्रेनद्वारे ती खेचण्यात आली.

कशी बुडाली गाडी, ते समजले
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते,
तेव्हा बीएमसीने आपल्याकडून स्पष्ट केले होते की,
त्या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. ही गाडी त्या सिंक होलमध्ये कशी गेली ते आता स्पष्ट झाले आहे. घाटकोपरच्या या भागात एक 100 वर्ष जुनी विहिर होती.

आता सोसायटीच्या लोकांनी पार्किंग स्पेस बनवण्यासाठी त्या विहिरीला आरसीसीने झाकले होते. परंतु जेव्हा जोरदार पाऊस झाला तेव्हा आरसीसी पाण्यासोबत वाहून गेले आणि ती गाडी जमीनीच्या आत त्या विहिरीत गेली.
ही विहिर 50 फुट खोल आहे, जर घटनेच्या वेळी गाडीत कुणी असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती.

Coronavirus Patient |फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

Web Title : Mumbai: Drowned vehicle was pulled out of the well after 12 hours, rescue was done; Watch the video

Related Posts