IMPIMP

Mumbai News : होम क्वारंटाईन रुग्णांच्या हातावर पुन्हा शिक्का ! घराबाहेर पडल्यास दाखल होणार गुन्हा

by sikandershaikh
home-quarantine

मुंबई (Mumbai News) :सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Mumbai News |सांताक्रूज येथील हॉस्पिटलमधून 4 रुग्णांनी पलायन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं लक्षणं नसल्यानं होम क्वारंटाईन असणाऱ्या बाधित रुग्णांवर आता महापालिकेचं लक्ष राहणार आहे. आता पूर्वीप्रमाणे पुन्हा अशा रुग्णांच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहेत. इतकंच नाही तर अशा व्यक्तींना दिवसातून 5 ते 6 वेळा फोन करून ते घरी असल्याची खातरजमा केली जाणार आहे. जर त्यांनी नियम मोडला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे असा इशारा पालिका प्रशासनानं दिला आहे.

मुंबईत सध्या रुग्णांच्या संपर्कातील तसंच संशयित 81 हजार 838 नागरिक हे होम क्वारंटाईन आहेत. लक्षणं नसलेले रुग्ण, संशयित लोकांनी अनुक्रमे 14 दिवस व बाधित नसल्याचा अहवाल येईपर्यंत 7 दिवस क्वारांटाईन होणं बंधनकारक आहे. काही रुग्ण मात्र नियम मोडत आहेत. बाधित व्यक्तींची योग्य माहिती ठेवून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचेही विलगीकरण केले जाणार आहे.

… तर सक्तीनं इंस्टिट्युशलन क्वारंटाईन केलं जाणार

जर पालिकेचे नियम मोडून घराबाहेर पडलेल्या रुग्णाची तक्रार आली तर विभाग स्तरावरील वॉर रुममार्फत अशा रुग्णांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अशा रुग्णांना सक्तीनं संस्थात्मक विलगीकरण (इंस्टिट्युशलन क्वारंटाईन) केलं जाणार आहे.असंही प्रशासनानं सांगितलं आहे.

ब्राझीलमधून येणाऱ्यांचे संस्थात्मक विलगीकरण

ब्राझीलमधून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई विमानतळावर सक्तीनं 7 दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं जाणार आहे.

जळगाव : राम मंदिरासाठी अवैधरित्या ‘वर्गणी’ची वसूली, FIR  दाखल

Related Posts